Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लेवा पाटीदार समाजाचा 1 मे 2024 या दिवशी 27 वा वर्धापन दिन व स्नेहमेळावा ,समता भातृ मंडळ प्रिंपी चिंचवड यांच्या वतीने महाराष्ट्र दिन , कामगार दिन या दिवशी या कामगार नगरीत साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने  पिंपरी  चिंचवड मधील सर्व लेवा समाज बांधव एकत्र येतात आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात ,एकमेकांनच्या भेटीगाठी होतात ,कारण हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये वेळ काढून आपल्या समाजाप्रती कर्तव्य करता येणे वेळे अभावी शक्य नसते ,म्हणून समता भातृ मंडळातील सर्व पदाधिकारी, मंडळाचे सभासद,व समाजातील लोक मिळून या दिवशी स्वता एकत्र येऊन भोजन तयार करतात .

समाजात काहीतरी वेगळे केलेले असतील असे मुलं, मुली, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक याचा सत्कार केला जातो , नवीन पिढीला यामुळे प्रेरणा मिळते, यावेळी कार्यक्रम ला 2000 पेक्षा जास्त मंडळी उपस्थित राहून एकत्र एकमेकांना वाढून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतात .

आपला समाज कसा एकत्रित राहणार त्यामुळे समाजाला कसे फायदे होऊ शकतात , समाजाची उन्नती कशी होऊ शकते ,नवीन येणाऱ्या पिढीला सुंदर असे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले, मोलाचे असे आपले विचार मांडले .

डान्स , चेस , अशा स्पर्धा बक्षीस , समाजातील उद्योगजक लोकांचा सन्मान ,समाजातील प्रेरणादायी महिलांचा सन्मान ही करण्यात आला ,समाजातील महिलांनी सुंदर अशा प्रकारे गणेशवंदना सादर करण्यात आली , आमच्या भगिनींनीच सूत्रसंचालन केले ,अशा प्रकारे समता भातृ मंडळातील सर्व पदाधिकारी च्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version