Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कुरुळी ( ता.खेड ) येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मिती चैत्र वद्य ८ शके १९४६ बुधवार १ मे आणि गुरुवार २ मे रोजी श्री कालभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज यांचा उत्सव कुरुळी नगरीत साजरा होत आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा बुधवारी पहाटे श्रींची काकड आरती होईल. तदनंतर महापुजा, अभिषेक व आरती, श्रींना हारतुरे, मांडव डहाळे होणार आहे. त्या नंतर वाजता श्रींना चंदन उटी लावून श्री कालभैरवनाथ महाराजांच्या तांदळाला रुपाला मुर्ती रुप देण्यात येईल. पंरपरेनुसार आरती झाल्यानंतर महिलांना श्रींचे दर्शन घेण्यास मंदीरात प्रवेश देण्यात येईल. देवाचे १२ गाडे ओढण्याचा कार्यक्रम होईल. रात्री कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगांकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. तदनंतर रात्री १०:०० ते ११:०० श्रींची पालखीचे मिरवणुक व शोभेच्या दारुची आतषबाजी होईल.

गुरुवारी दुपारी ०४:०० वाजता तुफानी निकाली जंगी कुस्त्यांचा आखाडा होईल. या सर्व कुस्त्या प्रामुख्याने निकाली होतील. रात्री ०७:०० वाजता जल्लोष लावन्यवतिंचा ॲार्केस्ट्रा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास लाईट सांऊड स्पीकर व्यवस्था श्रीनाथ सांऊड सर्व्हिसचे मालक बजरंग बाळासाहेब लोखंडे यांनी केले. या प्रमाणे श्री कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यांचा उत्सव होत आहे. कमिटीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, ग्रामस्थांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. भाविक, नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कुरुळी ग्रामस्थांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version