Spread the love

 

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर हे निरीक्षक म्हणून गुरुवार ०२ मे रोजी शिरूर लोकसभेचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात गुरुवारी हॉटेल आरती एक्झिक्यूटिव्ह, प्रोटेक्ट कंपनीसमोर, एकता नगर, नाशिक हायवे, चाकण, पुणे येथे शिरूर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता लोकसभा निवडणूक प्रबंधन समिती सोबत बैठक, दुपारी १२ वाजता जिल्हा मोर्चा आघाडी तील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी २ वाजता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी ३ वाजता भाजपा कोअर कमिटीसोबत बैठक आणि दुपारी ४ वाजता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उत्तर पुणे जिल्ह्यातील शिवसेना, मनसे, आरपीआयचे नेते उपस्थित राहणार आहेत.

00000

Share.
Leave A Reply

Exit mobile version