Spread the love

 

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गावभेट दौऱ्यावर असताना म्हाळुंगे पडवळ गावात एका आजींनी त्यांची भेट घेतली. अनेक दिवसांनी आपला नातू भेटल्यानंतर कसं प्रेम दाटून येतं अगदी तसंच आजींनी डॉ.अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.. आलाबला घेऊन कडाकडा बोटं मोडली .

आजींचे प्रश्न हे सर्वसामान्य नागरिकांचं डॉ.अमोल कोल्हे यांच्यासोबत असणारं घट्ट नातं सांगणारे होते. आम्हा म्हाताऱ्यांना कोण सांभाळणार ? आमच्या पोरांना कोण कामाला लावणार ? हे प्रश्न आजींनी डॉ.अमोल कोल्हेंना विचारले, त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता “मी करणार, शंभर टक्के करणार” असं म्हणत आजीचा नातू खंबीर आहे हा विश्वास दिला.. त्यानंतर आजींच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान म्हणजे “आता सगळी चिंता मिटली” हेच सांगणारं होतं.

केवळ लोकप्रतिनिधी आणि मतदार यापलीकडे जाऊन एका खासदारांने निर्माण केलेल्या नात्याचं, विश्वासाचं हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे !

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version