Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील शत्रुघ्न (बापू) काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्रभाग क्रमांक २८ रहाटणी-पिंपळे सौदागरचे कार्यक्षम मा.  नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमिताने परिसरात विविध धार्मिक व समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सौदागर खंडोबा देवस्थान,देवीआई दत्त मंदिर या ठिकांनी श्रीचा अभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच श्री शत्रुघ्न काटे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा निमित्त परीसरातील डॅफोडिल्स या सोसायटीमध्ये त्यांच्या सोसायटीचे अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात सोसायटीमधील सुमारे १० टीमने सहभाग घेतला.
श्री शत्रुघ्न काटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील नागरिकांनी भेट घेत शुभार्शिवाद दिले व त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासात उंच झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा सकारात्मक प्रतिसाद देत भावना व्यक्त केल्या.

शत्रुघ्न काटे यांना शहरातील अध्यात्मिक,राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये मा.खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे,आमदार अश्विनी जगताप,आमदार महेश लांडगे,मा.आमदार विलास लांडे,जेष्ठ नेते  भाऊसाहेब भोईर व अनेक आजी-माजी नगरसेवक तसेच शहरातील प्रख्यात उद्योजक आणि व्यावसायिक,विविध संस्था व संघटनेचे मान्यवर सदस्य, स्पोर्ट्स फेडरेशन पदाधिकारी, व्यापार संघटनेचे सदस्य, प्रजापिता ब्रह्म कुमारी संस्थेच्या भगिनी , आर्ट ऑफ लिविंग सदस्य, परिसरातील जेष्ठ नागरिक संघ,महिला बचत गट सदस्य व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास काटे यांनी केले .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version