Spread the love

शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील–
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात व परदेशातही महावीर जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो आपल्या प्रत्येकाला अहिंसा प्रमोद धर्म हा संदेश भगवान महावीर यांनी दिला शालेय जीवनापासून मी त्यांच्या विचारांचे अनुकरण करीत आलो आहे.

वाघोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली दहा वर्षे देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भगवान महावीर यांचे विचार आत्मसात करून आपल्या देशाची विकासाची घोडदौड सुरू आहे.

सकल जैन संघ वाघोली यांच्या माध्यमातून महावीर जयंती निमित्त स्वरूपाच्या उपक्रमांचे व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भगवान महावीर यांना वंदन करून पदयात्रेत सक्रिय सहभाग घेतला.

 

जैन धर्मीय माता-भगिनी आजच्या शुभ दिनी “जल ही जीवन है” हा अतिशय मोलाचा व जीवनावश्यक उपक्रम राबवत आहे, याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. भविष्यातील युद्धे व लढाया पाण्यावरून होतील, त्यामुळे जास्तीत जास्त झाडांचे संवर्धन व पाण्याची बचत करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. सर्व जैन समाज बांधवांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version