Spread the love

 

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कुदळवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे मानाच्या गाड्याचे पूजन कार्यक्रम टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या हस्ते भक्तिभावात पार पडला.

श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव लवकरच सुरू होणार आहे यात्रा उत्सवानिमित्त नंदी स्वरूप बैलगाडा पूजनाचा कार्यक्रम नुकताच भक्तिभावाने पार पडला. सदर मानाचा गाडा पूजन कार्यक्रम हा यात्रा उत्सवातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो.

चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे परंपरेनुसार विधिवत पूजन केले, याप्रसंगी स्थानिक मान्यवरांसह,यात्रा कमिटीचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version