Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन  (AIMIM ) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना एक जातीत किंवा धर्माच्या चौकटीतून संकुचित वृत्तीने न पहाता व्यापक दृष्टीने राष्ट्राच्या निर्माता म्हणून पाहणे गरजेचे आहे आज देशातील प्रत्येक नागरिक बाबासाहेबांनी दिलेल्या  संविधानामुळे सन्मानाने जगत आहे मुस्लिम समाजावर त्यांचे थोर उपकार असून त्यांच्या उपकारातून कधीही मुक्त होता येणार नाही त्यांचे विचार नेहमीच मार्ग दाखवणारे आहेत असे मत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांनी व्यक्त केले .

यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन  (AIMIM ) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर ,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे  ,जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे , खालिद मुजावर , कार्याध्यक्ष नियाज देसाई ,सलामत शेख ,राजू अत्तार , अकिब शेख ,नईम शेख,शकील बाब शेख  इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version