Spread the love

*प्रेस नोट……*
*शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन…*

शाहूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शाहूनगर (चिंचवड) येथील श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महात्मा फुले यांनी समाजोद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा उपस्थित वक्त्यांनी घेतला. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. वाचनालयाचे संचालक आणि वाचक वर्ग उपस्थित होता. संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील, सहाय्यक प्राजक्ता पवार आणि रवींद्र अडसूळ यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version