Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महापालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ‍ दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी
जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version