Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीची पहिली यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे. मावळ मधून संजोग वाघेरे पाटील यांना तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून राजन विचारेंना संधी देण्यात आली आहे. आज यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेच्या पुढील उमेदवारांची घोषणा मी करत आहे.

क्र. मतदार संघ. उमेदवार
०१) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
०२) यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
०३) मावळ – संजोग वाघेरे पाटील
०४) सांगली – चंद्रहार पाटील
०५) हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
०६) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
०७) धाराशिव – ओमराजे निंबाळकर
०८) शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
०९) नाशिक – राजाभाऊ वाजे
१०) रायगड – अनंत गीते
११) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
१२) ठाणे – राजन विचारे
१३) मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
१४) मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
१५) मुंबई वायव्य – अमोल किर्तीकर
१६) परभणी – संजय जाधव

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version