Spread the love

भोसरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने ३६ शिरूर लोकसभा मतदार संघा अंतर्गत २०७ भोसरी विधानसभेच्या वतीने मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसरी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम दिनांक १९ मार्च रोजी भोसरी विधानसभा २०७ मार्फत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्यासह तहसिलदार  सतिश थेटे, शिक्षणाधिकारी संगिता घोडेकर / बांगर, नायब तहसिलदार  अपर्णा देशपांडे, सहा प्रशासन अधिकारी श्रीम. रजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यामिक विद्यालय, भोसरी येथे ‘निवडणूक – लोकशाहीचा उत्सव’ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

तसेच यावेळी उपस्थित पालकवर्गास / मतदारांस सहाय्यक नोडल अधिकारी  अमोल फुंदे यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून दिले.  विनायक भुजबळ यांनी मतदार प्रतिज्ञा घेऊन तिचा आशय समजावून दिला.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री. शेलार सर व सहकारी शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version