Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांपासून स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नव्याने रस्ते विकसित करण्याचे काम सुरू होते आणि बऱ्यापैकी कामे पूर्ण देखील झाली परंतु प्रभागातील फक्त कुणाल आयकॉन रस्त्याचे काम मात्र काही कारणास्तव रखडले गेले होते.
 शत्रुघ्न काटे यांनी वारंवार या रस्त्याच्या काँक्रीटीकरण बाबत संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा केला आणि या कामा संदर्भात असलेली सर्व समस्येवर उपाय काढीत प्रश्न मार्गी लावला.
याचे फळ म्हणून आज त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.
 कुणाल आयकॉन रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी ४२ कोटी रकमेची ई-निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कुणाल आयकॉन रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
 शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्या चे काम लवकर सुरू होईल तसेच या रस्त्याबाबत नागरिकांना असणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version