Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे दुर्गाशक्ती पुरस्कार समारोह साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रिया बडवे संचालिका बेलराईज इंडस्ट्रीजच्या,  हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी. डॉ सत्वशीला शिरोळे संचालिका फिटवेल गॅसकेंट प्रायव्हेट लिमिटेड, यांना इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर ,आमदार उमा खापरे, उपायुक्त  अजय चारठणकर , अभिनेते  विनायक भावे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते देण्यात आला .

तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात तसेच यावेळी महिला दिनानिमित्त लकी ड्रॉ द्वारे उपस्थित भाग्यवान विजेत्या महिलांना दहा पैठण्या देण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार उमा खापरे, उपआयुक्त अजय चारठणकर , हिंदवी पाटील, सुप्रिया बडवे ,शिरोळे मॅडम, प्रसिद्ध अभिनेते दुर्गा ब्रिगेडचे महाराष्ट्र चे कला सांस्कृतिक विभाग प्रमुख  विनायक भावे जिल्हा उद्योग केंद्राच्या निरीक्षक  शैला वानखेडे, रील स्टार/ अभिनेत्री  ऐश्वर्या कांबळे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .

 

यावेळी सर्व महिलांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केले . यावेळी महिलांना उद्योग योजना स्टार्टअप उद्योग महिलांना स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील महिलांसाठी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी स्टार्टअप उद्योग आणि रोजगारासाठी मॅग्नेटिक व्हिलेज ही संकल्पना जाहीर केली .तसेच पुढील काळामध्ये जिल्ह्यातील सर्व महिला बचत गट उद्योजिका यांना दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पूर्णतः मार्गदर्शनही सहकार्य करण्यात येणार आहे .

तसेच शहरातील मुलींना महिलांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात येणार असून उद्योजक गटांची निर्मिती करण्यात येणार आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवलकर यांनी केले वैभव जगताप यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version