Spread the love

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गाडीवर काम करणाऱ्या सुनिता दिगंबर मुन्ने या महिलेचा यथोचित सन्मान शाल आणि रोख रक्कम देऊन दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केला.
ओला सुका हा कचरा
विलगीकरण करू या..
पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या !
या गीताची धून लावलेली कचऱ्याची गाडी रोज शहरातील कचरा गोळा करीत फिरते. आपले शहर या कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांमुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ राहात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुनिता मुन्ने या महिला कामगार ओला आणि सुका कचरा विलग करून आमच्याकडे द्या असे हसतमुख होऊन सांगत नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत.

कचऱ्याच्या गाडीत त्या ढिगावर बसून अन् तोंडाला मास्क लावून काम करतात. त्यांचा जागतिक महिला दिनी सन्मान करताना विशेष आनंद होत आहे असे कंक यांनी सांगितले.
वृत्तांकन – सुरेश कंक
७५२२९०२७२७

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version