Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने “जागतिक महिला दिनानिमित्त” डांगे चौक, थेरगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा माजी आमदार दिप्ती चौधरी व शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील महिलांना माता जिजाऊ पुरस्कार – श्रीमंती शकुंतला कदम, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – ॲड. निशा चव्हाण, माता अहिल्याबाई होळकर पुरस्कार – सौ. आशा कदम, माता सावित्रीबाई फुले पुरस्कार – सौ. शारदा मुंडे, माता रमाई पुरस्कार – श्रीमती सुलोचना कांबळे, सरोजनी नायडू पुरस्कार – श्रीमती भारती घाग, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी पुरस्कार – श्रीमती मनिषा चपणे, मदर तेरेसा पुरस्कार – डाॅ. मनिषा सुर्यवंशी, सिंधुताई सकपाळ पुरस्कार – सौ. वैजयंती विजय कदम, अंतराळ वीर कल्पना चावला पुरस्कार – कुमारी खुशी मुल्ला यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, सेवादल अध्यक्ष प्रा. ॲड. किरण खाजेकर, डॉक्टर सेल अध्यक्षा मनिषा गरुड, चिंचवड विधानसभा महिला ब्लॉक अध्यक्षा निर्मला खैरे, ज्योती गायकवाड, प्रियंका कदम, भाऊसाहेब मुगुटमल, उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, गणेश गरड, गौतम ओव्हाळ, राहुल शिंपले, सतीश भोसले आदिसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version