Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  प्रभाग क्र. १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी उपायुक्त यांच्याकडे केली आहे.

प्रभाग क्र. १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे तरी देखील प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरण्याचे काम चालू असून अजूनही हा तलाव नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आलेला नाही. सध्या उन्हाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जलतरण तलाव चालू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांच्या हितासाठी लवकरात लवकर कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव वापरासाठी खुला करण्यात यावा,असे निवेदनात म्हंटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version