Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संत गाडगे बाबा महाराज जयंती साजरा करण्यात आली.यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,मुख्याध्यापिका नाझनीन शेख,उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, फहाद खान, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी स्वछता मोहीम राबविण्यात आली. ये वेळी शाळा परिसराची स्वछता करून , झाडे लावा झाडे जगवा, स्वछ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड, साफ सफाई करूया, आजार हटवुया आदी फलक उभारण्यात मध्ये स्वछता मोहिममार्फत जनजागृती करण्यात केली. या वेळी शाळेतील पाचवी ते नववी  विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका जयश्री घोलप व जपानी भाषा चे शिक्षक संदीप हवेले यांनी आभार  मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version