पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते लक्ष्मणभाऊ कला आणि क्रीडा अकादमीच्या वतीने लक्ष्मण जगताप करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये एकदम कडक नाट्यसंस्था मुंबईच्या पाटी एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान पटकाविला.
