Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  -पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) या महाराष्ट्रातील नामांकित शासकीय महाविद्यालयांच्या वतीने एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी बातमी दिल्या बद्दल राग ठेवत महाविद्यालयाच्या वतीने तक्रार दाखल केली असून ही तक्रार चुकीची असल्याबाबत मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिओईपी चे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) हे नामांकित शासकीय महाविद्यालय आहे व आम्ही माध्यमकर्मी आणि पत्रकार संघटना ही आपल्या महाविद्यालयाकडे त्याच आदराने पहात आहोत. आपल्या अनेक चांगल्या उपक्रमांना माध्यमांनी भरभरून प्रसिद्धी देत जगासमोर आणले आहे.व हे स्पष्ट करण्याचा उद्देश इतकाच आहे की आपल्याकडूनही माध्यमांना तोच आदर मिळावा अशी अपेक्षा असताना आपल्याकडून पुण्याच्या एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात आपल्या प्रशासनाकडून चुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. माध्यमांनी ज्या प्रकारे चांगली बाजू दाखविणे अपेक्षित आहे तसेच चुकीची बाजूही पुढे आणणे अपेक्षित आहे. अर्थात या चुकांची प्रशासनाने दखल घेऊन त्यामध्ये सुधारणा आणणे अपेक्षित आहे. पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीओईपीमधील विद्यार्थ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची दखल घेऊन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित असताना त्यांच्याविरोधात तक्रार करणे अत्यंत चुकीचे आहे.व गोंजारी हे ज्येष्ठ, सुसंस्कृत पत्रकार आहेत.

अनेक वर्षापासून ते पुण्यामध्ये तटस्थप-णे पत्रकारिता करीत आहेत.त्यांनी महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून बातमीच्या माध्यम ातून ही परिस्थिती पुढे आणली म्हणूनमहाविद्यालय प्रशासनाकडून त्यांच्या विरोधात तक्रार केली जाणे, हे सुसंस्कृत महाधियालयाकडून अपेक्षित नव्हते. विद्यार्थ्यांनी मोठ्या धाडसाने मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा मराठी पत्रकार संघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून करणार आहोत. तत्पूर्वी महाविद्यालय प्रशासनाने हे प्रश्न अतिशय सकारत्मकपणे स्वीकारून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी असे महाविद्यालयाचे कुलगुरू यांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच विनंतीची दखल घ्यावी अन्यथा प्रामाणिक पत्रकारितेच्या मागे उभे राहण्यासाठी नाईलाजास्तव कॉलेज प्रशासनाच्या विरोधात राज्यस्तरीय आंदोलन करावे लागेल.असे निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version