
मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभातआमदार जगताप यांचे आश्वासन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांचा सत्कार समारंभ चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष अभिजित बारणे, आमदार शंकर जगताप, मराठी पत्रकार संघ अध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रोहित खर्गे, महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होते. यावेळी कार्याध्यक्ष दादाराव आढाव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्क प्रमुख संतोष महामुनी, संदीप सोनार, सदस्य शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील,राजश्री आतकरे, संगीता पाचंगे, सीताराम मोरे, उमेश यादव, संतलाल यादव, श्रीधर जगताप, आदी पत्रकार बांधवांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संघांचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक भाषणात “चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप हे विकासासाठी झाटणारे तसेच संयमी आमदार म्हणून नेहमी ख्याती मिळवून असून ते नेहमीच पत्रकारांच्या समस्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे स्थायी समिती अध्यक्ष अभिजित बारणे हेही नेहमी चुकीचे बाजूला ठेवू व चांगल्या कामांना पुढे नेऊ म्हणणारे एक सक्षम लोकप्रतिनिधी असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष जोशी यांनी सांगितले. तसेच संघाच्या मुंबई येथील अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघाला दिलेल्या पत्रकार भवना बद्दलच्या आश्वासन व त्या पत्राची प्रत आमदार देत पत्रकार भवनास स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नावं देण्या सदर्भात मत असल्याचे सांगितले . यावेळी आमदार शंकर जगताप यांनी स्वागतपर भाषणात पत्रकार संघाची मागणी पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करण्यात येईल व संघाची कार्यकारणी ही सर्वसामावेशक असल्याचे व प्रदेशाध्यक्ष किरण जोशी हे आपल्या शहरातील एक राज्यव्यापी प्रतिनिधित्व म्हणून काम करत असून ही एक अभिमानाची बाब असल्याचे यावेळी मत स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रम पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी स्वस्त व हक्काची घरं व इतर योजना याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन विवेक इनामदार व आभार रोहित खर्गे यांनी मानले.

