Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कोषाध्यक्षपदी मनोज ब्राह्मणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मनोज ब्राह्मणकर हे गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप ओबीसी प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत ब्राह्मणकर यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी तसेच समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा मनोज ब्राह्मणकर यांचा प्रयत्न राहिला आहे. आगामी काळातही ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version