Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गीताचा कथित अवमान झाल्याच्या निषेधावरून आज मोठा गोंधळ झाला. भाजपच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आणि सभा तहकूब करण्याची मागणी केली.

सभेच्या सुरुवातीलाच भाजप नगरसेवकांनी कथित अवमानाचा निषेध नोंदवत या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ‘ज्यांना वंदे मातरम् गीत पूर्णपणे येते त्यांनीच ते म्हणावे’ या वक्तव्यावरूनही सभागृहात वाद निर्माण झाला.

भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले आणि काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
वाढता गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता महापौर रवी लांडे यांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. त्यानंतर सभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

‘वंदे मातरम्’च्या कथित अवमानाचा मुद्दा थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोचल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version