Spread the love

 

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत गृह प्रकल्प रद्द झाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी गृहप्रकल्प योजना अंतर्गत किवळे येथील प्रकल्पात घरे देण्यात येत आहेत. सदर लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफ करणे व पी एम ए वाय अनुदान बाबत बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून कीवळे गृहप्रकल्प लाभार्थ्यांना अनेक वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांना मुद्रांक शुल्क माफ करण्यात यावे आणि पंतप्रधान आवास योजनेतून अनुदान देण्यात यावे. याबाबत विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते व पदाधिकारी, लाभार्थ्यांसह भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

त्यावेळी या गृह प्रकल्प लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सदर गृह प्रकल्प लाभार्थ्यांच्या हितासाठी लवकरच पाठपुरावा करून सदरच्या विषयावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य सलीम डांगे, सखाराम केदार, अमृत पाटील, अंगद मुंगळे, सुनीता कावळे, सुमन साठे, मनिषा घोडके, रोशनी सरदार, विष्णू माने आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version