Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन आज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यालय काळभोरनगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय पिंपरी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर काळभोरनगर, ऐश्वर्यम सोसायटी, फुले नगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी आकुर्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थित राहून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद येथील शाळकरी मुले आणि शिक्षक मोठया संख्येने कर्यक्रमास हजर होते. कार्यक्रम अंतर्गत मुलांनी देश राष्ट्रगीत आणि देशपर भक्तीगीत सादर केले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. . देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे तसेच देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या वीर जवानांचे यावेळी स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version