Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कारगिल विजय दिनानिमित्त येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि डायनॅमिक युथ स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर कॅप्टन भाऊसाहेब तांबे आणि सुभेदार मेजर कॅप्टन संताजी घार्गे यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत शालेय स्तरावर नेमबाजीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या आयोजनास कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका वृंदा मुलतानी-जोशी, उपमुख्याध्यापिका लिझा सोजू आणि शालेय समन्वयक गुलनाज खान यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मावळ, जुन्नर, बारामतीसह जिल्ह्यातील ४३ शाळांनी भाग घेतला. १४, १७ व १९ वर्षांखालील, ओपन आणि पॅरा अशा विविध गटांमध्ये १२५ नेमबाजांनी रायफल (ओपन साईट व पीप साईट) आणि पिस्तूल शूटिंग प्रकारात कौशल्य पणाला लावले. डायनॅमिक युथ स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक-संचालक रमेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version