
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनेच्या स्विटी मालतापुरे यांची पिंपरी-चिंचवड उपप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक सक्षम व मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख युवती सेना श्वेता कापसे यांनी स्विटी मालतापुरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
