Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय प्रकोष्ठ (मोर्चा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव व पिंपरी-चिंचवड प्रभारी भरत (नाना) पाटील, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. उत्तर भारतीय समाजाचा भाजपवर नेहमीच विश्वास राहिला असून, नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील नागरिकांच्या समस्या सोडविणे, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच बूथ स्तरापर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटना मजबूत करण्याचा संकल्प केला. यावेळी कार्यक्रमास भाजपचे महासचिव मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ये , नगरसेविका स्नेहा कलाटे, अर्चना तापकीर, भाजप उपाध्यक्ष हरेश तापकीर, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती महासचिव धनराज बिर्दा, उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री प्रद्युम्न शुक्ला, चिराग गुप्ता, युवा नेते हेमंत डांगे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश बारणे, छत्रभुज झाडे आदी उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकारी
महासचिव : मुसाफिर गिरी, पंकज ओझा, राजीव पाठक, हरिशंकर यादव.
उपाध्यक्ष : धीरेन्द्र शर्मा, नेमचंद विश्वकर्मा, प्रशांत पाण्डेय, आलोक सिंह, रणधीर सिंह, तहसीन खान, कुमार गौरव, रामायण सिंह, रामजीत यादव, दिक्षांत देव उपाध्याय, अमृता यादव.
महिला अध्यक्ष : डॉ. काजल पांडे

युवा अध्यक्ष : गौरव वर्मा
प्रसिद्धी प्रमुख : अनुराग मिश्रा
सोशल मीडिया प्रमुख : चंचल कुमार

कोषाध्यक्ष : अंकुश साहू
सचिव : शामजीत यादव, रणधीर शर्मा, अरुण शुक्ला, राम अशिष साहनी, संतोष मिश्रा, इसराद अंसारी, ओम प्रकाश शर्मा, पंकज रौतेला.

कार्यकारिणी सदस्य : अभिषेक ओझा, अजय यादव, ज्योति रंजन मिश्रा, राजीव रंजन शर्मा, अरविंद सिंह पटेल, सुरेंद्र प्रजापति, अभिषेक चोबे, मनोज सिंह, विनोद ओझा, रामवीर शर्मा, योगेश सिंह, सुबोध सिंह, भावेश चौबे, सुनील सिंह, शशिकांत पाण्डेय आदी उत्तर भारतीय समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक उत्तर भारतीय प्रकोष्ठाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष संतोष वशिष्ठमुनि ओझा यांनी केले. सूत्रसंचालन भाजप शहर जिल्हा महासचिव मधुकर बच्चे यांनी केले, तर पंकज ओझा यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version