Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ‘ज्ञानसूर्य’ डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या दूरदर्शी विचारांनी आणि अथक परिश्रमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविताना त्यांनी ज्ञान, शिक्षण आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
प्रार्थना सभा दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ बिल्डिंग ऑडिटोरियम, मेडिकल कॉलेजजवळ, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे होणार आहे. या सभेला काँग्रेस नेते व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित राहणार आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव असलेल्या कुटुंबीय, मित्र, सहकारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version