Spread the love

कल्याण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कल्याण शहर व डोंबिवली परिसरातील अनेक मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांची डोंबिवली येथे मीटिंग होऊन त्यामध्ये एकमताने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकां च्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली विभागातर्फे रस्ता सुरक्षा विभागात महत्वपूर्ण योगदान देण्याचे ठरले सदर मीटिंगमध्ये कंपनीच्या सी एस आर च्या माध्यमातून हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा जागृती उपक्रम राबवण्याचे ठरले सदर कार्यक्रमाला मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष राजू घाटोळे वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार प्रसिद्धीप्रमुख विनोद वरखडे सोशल मीडिया प्रमुख सुरज देवकर शिवाय मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक अनुदीप येचकर सल्लागार संतोष कपटकर पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी ज्योतीताई रवी माळेकर, महाराष्ट्र राज्य सचिवपदी रियाताई गजानन जोशी, तर महाराष्ट्र राज्य संघटकपदी निलेश शेठ हरिश्चंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकां तर्फेअभिनंदन करून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या राज्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल व्यवसायाशी संबंधित अडचणी, परवाने, प्रशिक्षण व्यवस्था, विद्यार्थी व चालकांच्या समस्या तसेच शासनाच्या विविध नियमांबाबत संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कल्याण व डोंबिवलीमधील मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या सुद्धा पदाधिकारी म्हणून नियुक्ती पत्र सदरप्रसंगी देण्यात आले संघटनेच्या हा विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी व व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. संघटनेच्या वतीने सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या हितासाठी व न्याय हक्क मागण्यांसाठी संघटित पणे असोसिएशनच्या वतीने काम करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी यादव माळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version