
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या १२व्या पुण्यस्मरणानिमित्त दिवंगत विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय काळभोर यांच्या आयोजनातून अनाथ व दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
८ ऑगस्ट रोजी रावेत येथील झूंज दिव्यांग संस्था, आश्रम प्रशिक्षण केंद्र येथे अनाथ व दिव्यांग मुलांना गरजू साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर थेरगाव येथील इमॅन्युअल ऑर्फनेज, बिलीव्हर्स चर्च येथे अनाथ मुलांसाठी अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमास अजय काळभोर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत अनाथ व दिव्यांग मुलांसाठी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कै. विलास आप्पा काळभोर यांच्या स्मृतींना सामाजिक कार्याच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

