
पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणी व नूतन पदाधिकारी पदग्रहण समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका पत्रकार कक्षात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर व सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश संघटक अरुण कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर बाबर व सत्तारूढ पक्षनेते शितोळे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक उत्तम केंदळे उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघांचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अरुण कांबळे,
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रोहित खर्गे, महिला पुणे जिल्हा अध्यक्षा मनीषा थोरात पिसाळ, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष अर्चना मेंगडे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव, उपाध्यक्ष गणेश मोरे, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्क प्रमुख संदीप सोनार, नागेश खजूर्गीकर, बलभीम भोसले, उमेश सनस, सीताराम मोरे, उमेश यादव, संतलाल यादव,श्रीधर जगताप,अजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, शहरातील नागरिकांच्या भावना, समस्या आणि अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार बांधव करत असतात. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारांनी सकारात्मक, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न मांडावेत पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासोबतच शहराच्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याचे काम पत्रकारांनी करावे, असेही उपमहापौर बाबर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कांबळे यांनी, सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले तर आभार रोहित खर्गे यांनी मानले. या कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, विविध माध्यमांचे पत्रकार तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
