Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजी बाळासाहेब बारणे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे कोणत्याही राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. अशा वक्तव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून राजकारणातील सभ्यता आणि महिलांचा सन्मान कायम राखला पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version