Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुपवतीने केशवनगर चिंचवड येथे जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार घालून विधिवत पूजा करून शिव वंदना करण्यात आली.

मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त हिंदू जन जागरण समितीच्या सेवा कार्यास शिवभक्तांच्या उपस्थितीत औषधे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,गणेश बच्चे,पंढरीनाथ बरीदे, पोपट बच्चे,संजय मोकाशी,शरद देशपांडे, रोहिणी बच्चे,अक्षय गारगोटे ,मच्छिन्द्रनाथ थोरवे,अर्चना बच्चे,काजल बच्चे,उत्तम विटुळे, सखाराम देशपांडे,श्रावणी बच्चे,असावरी बच्चे आदी पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,व अनेक शिवभक्त उपस्थित होते.मधुकर बच्चे युवा मंच वतीने हिंदू जनजागृती संस्थेस औषधे सेवा दिल्याबद्दल सर्वांनी कौतुक करून बच्चे यांना धन्यवाद दिले.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी  कार्यक्रमाचे प्रास्तविक  केले.तर चैतन्य ग्रुपचे गणेश बच्चे यांनी  आभार मानले. उपस्थित सर्वांना प्रसाद वाटपही करण्यात आले.या वेळी सर्वांनी जय शिवाजी जय भवानी घोषणा देऊन परिसरात भगवे वातावरण तयार झाले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version