
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षाने चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत आरती संभाजी भेगडे यांची चिंचवड विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिप्रेत संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
नियुक्तीनंतर आरती भेगडे यांच्यावर शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, चिंचवड विधानसभा क्षेत्रात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

