Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर अधिकारी-कर्मचारी असे एकूण ३५ जण सेवानिवृत्त

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिकेच्या वतीने जूलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, नंदकुमार इंदलकर,मुख्य लिपिक माया वाकडे, विविध विभागांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

जुलै २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये लेखाधिकारी प्रकाश ज्ञानोबा जाधव, कार्यालय अधिक्षक दौलत मदगे, सहाय्यक उद्यान निरीक्षक सुरेश कोळेकर, कॉम्प्युटर ऑपरेटर सुरेखा झेंडे, ज्ञानेश्वर शेडगे, मुख्याध्यापक सविता जाधव, जयश्री गळीतकर, उप शिक्षिका संगीता रोकडे, उज्ज्वला तापकीर, शिला सोनवणे, सर्व्हेअर मुकुंद क्षिरसागर, सुरक्षा सुपरवायझर भारत भले, रखवालदार राजेंद्र रायकर, ईश्वर बहोत, चंद्रकात राऊळ, मजूर दत्तात्रय काळभोर, दत्तात्रय टोपे, दिलीप गव्हाणे, शंकर धुमाळ, सफाई सेवक अशोक कांबळे, ज्योतीराम खैरमोडे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छा निवृत्त घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरूण सुपे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, मनोहर जावरानी, वायरलेस ऑपरेटर श्रीकृष्ण बाबर, दूरध्वनी चालक जालिंदर साखरे, मुकादम राकेश गायकवाड, वंदना ओव्हाळ, शालन करडे, सफाई कामगार राजू शिंदे, बापू गायकवाड,अनिता रेड्डी,नमिना चव्हाण,सफाई सेवक राणू गायकवाड आणि भारत गायकवाड यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी,सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार माया वाकडे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version