Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत माजी महापौर दिवंगत मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दिवंगत मधुकरराव पवळे यांच्या प्रतिमांना तसेच निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसदस्य निलेश तरस,नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुप्रिया चांदगुडे, मधुरा शिंदे, ऐश्वर्या तरस, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य सचिन चिखले,माजी नगरसदस्या सुमन पवळे,विशेष अधिकारी किरण गायकवाड विविध पदाधिकारी तसेच दिवंगत मधुकरराव पवळे यांचे नातेवाईक लांडे, सुनिता चोरघे, रेणुका उत्तेकर, ज्योती गवारे, राजलक्ष्मी चोरघे, ओंकार पवळे,विनित गवारे आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समता, परिवर्तन आणि साहित्य क्षेत्रातील कार्याचे तसेच माजी महापौर दिवंगत मधुकरराव पवळे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाजहित व शहर विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version