Spread the love

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साई चौक येथील लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रथमेश लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये येथील भाजी विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंती दरवर्षी साजरा करीत असतात. समाजोपयोगी व समाज प्रबोधनात्मक काम करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे मान सन्मान यावेळी करण्यात येत असतात.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य,शाहिरी आणि सामाजिक विचारांतून वंचित,शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या ओजस्वी शाहिरीतून जनजागृती करत महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ दिले.त्यांचे समता,स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाच्या सन्मानासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे,हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे त्या प्रसंगी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले.

याप्रसंगी कुणाल धिवार,रमेश डफळ,संदीप पाटील,नितीन कुचेकर,गणेश मते,तौफिक सय्यद,प्रवीण भोसले,जगदीश बच्छाव,अंकुश आपेट,भरत प्रसात,खंडेराव हल्लाले,सयाजी आगलावे,गणेश पैठणी,नितीन दोधाड,वैभव काळे,अरुण जाधव,बपीराम भोंगे,मनोज शिंदे,नवीन खान,एजास शहा,किरण वाणी,विपुल शिंदे,अंजना शिंदे,नंदा जाधव आदी भाजी विक्रेते,मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version