Spread the love

१ ते ७ ऑगस्ट दरम्यान भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे होणार भव्य आयोजन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचार प्रबोधन पर्व २०२६ चे आयोजन १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आले आहे. या सात दिवसीय महोत्सवात सामाजिक प्रबोधन, वैचारिक परिसंवाद, साहित्यिक, संगीत, लोककला, व्याख्याने आणि कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि त्यानंतर सकाळी ९.३० वा. भक्ती-शक्ती चौक येथे त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून होणार आहे.
महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या प्रबोधन कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप,उमा खापरे, अमित गोरखे,शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याशिवाय शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया गटनेते कुणाल वाव्हळकर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, महापालिकेचे सर्व प्रभाग अध्यक्ष, यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यानंतर सनईवादन, येडेश्वरी हलगी ग्रुपकडून हलगीवादन तर सकाळी १० वाजता बँड स्पर्धा होणार आहेत. १०.३० वाजता “ही छक्कड अण्णाभाऊं” हा शिवाजी भिसे यांचा कार्यक्रम तर बापू पवार यांचा लेखणीचा बादशहा हा कार्यक्रम ११.३० वाजता होणार आहे. दुपार सत्रात १ वाजता ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रम तर दुपारी ३ वाजता ‘स्वरचंदन’ हा सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी ५ वाजता ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ आणि सायंकाळी ७ वाजता ‘मेरा भारत महान’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सनईवादनाने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता मराठी म्युझिक कॉन्सर्ट हा राधा खुडे यांचा गीतगायन कार्यक्रम, दुपारी १२.०० वाजता ‘ऑरा’ सांस्कृतिक कार्यक्रम स्मिता गायकवाडव मानसी भोसले या सादर करणारआहेत. , दुपारी १.३० वाजता अनिकेत जवळेकर हे ‘स्वरलहरी’ गीतांद्वारे अण्णा भाऊंना अभिवादन करतील, दुपारी ३ वाजता ‘आरक्षणाची समता व उपवर्गीकरणाची गरज आणि वास्तव’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे ‘आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे – क्रांतीचा धगधगता इतिहास’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर सायंकाळी ६.०० वाजता ६५ कलाकारांचा ‘फोक संस्कृती’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम लखन असायचे हे ‘पठ्ठा लहुजींचा’, तर सकाळी ११ वाजता ‘गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम गायत्री शेलार व नीलेश देवकुळे सादर करतील.दुपारी १ वाजता ‘अण्णांची गौरवगाथा’ हे कार्यक्रम होणार असून, दुपारी ३.०० वाजता ‘मातंग समाजाचा प्राचीन इतिहास’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता ‘स्वर पंचम’ हा संगीत कार्यक्रम आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘गजर अण्णाचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक चंद्रकात शिंदे हे सादर करणार आहेत.

मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी ११.३० वाजता ‘गीते अण्णाभाऊंची’, दुपारी १.०० वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे कौटुंबिक व सामाजिक व्यवस्थेवरील प्रबोधनपर व्याख्यान, दुपारी २ वाजता काजल शिंदे यांचे महिला जनजागृतीपर व्याख्यान, दुपारी २.३० वाजता ‘मातंग समाजातील शिक्षणातील आव्हाने व सामाजिक उपाय’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५.०० वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘माय मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अमर पुणेकर व आरती पुणेकर हे प्रबोधनपर गीते सादर करतील.दुपारी १२ वाजता ‘गाता शूर वीरांची’, दुपारी २.०० वाजता ‘साहित्य सम्राट अण्णाभाऊ महान’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३ वाजता ‘महिला सक्षमीकरण : आजची गरज व उद्याची आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५.०० वाजता सुप्रसिद्ध गायक साजन बेद्रे हे ‘अण्णा तुमच्यासाठी’ हा लोकगीते व प्रबोधनपर गीते सादर करतील आणि सायंकाळी ७.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित केले आहे.यांचे संयोजन सुनिल भीसे व विशाल कसबे करणार आहेत. दुपारी १.०० वाजता गीत प्रबोधन, दुपारी ३.०० वाजता प्रबोधनपर गीतगायन, दुपारी ४.०० वाजता ‘लेखणीचा बादशहा’, सायंकाळी ५.०० वाजता सुप्रसिद्ध गायक आमदार गीत फेम संकल्प गोळे आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘जॉयल म्युझिकल नाईट्स’ या कार्यक्रमांनी रसिकांची मेजवानी होणार आहे.

शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी समारोपाच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता ‘साहित्याची खाण – अण्णा भाऊ महान’ पल्लवी घोडे या सादर करतील तर सकाळी ११.३० वाजता आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील व्याख्यान प्रा.प्रदीप कदम हे देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता अण्णा भाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील गीतांचा कार्यक्रम, दुपारी २.०० वाजता प्रबोधनपर गीते, दुपारी ४.०० वाजता शाहीर युवराज ढगे व निवास चव्हाण हे सादर करणार आहेत. पोवाड्यांचा कार्यक्रम, सायंकाळी ५.०० वाजता पद्मश्री गिरीश प्रभुणे व माजी राज्यसभा सदस्य डाॅ.विनय सहस्त्रबुध्दे यांचे हस्ते सत्कार समारंभ होणार आहे तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या ३० कलाकारांच्या भव्य गीतमय कार्यक्रमाने या प्रबोधन पर्वाचा समारोप होणार आहे.

या सात दिवसीय सर्वासाठी खुला व विनामूल्य असलेल्या प्रबोधन पर्वामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, व्याख्याते, साहित्यिक, कलाकार आणि लोककला सादर करणारे कलाकार सहभागी होणार आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा, सामाजिक समता, लोकसंस्कृती आणि प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version