Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर गावठाण येथील प्राथमिक शासकीय दवाखान्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दवाखान्याची पाहणी करण्यात आली. यावेळी औषधांचा तुटवडा, इमारतीची दुरुस्ती, डागडुजी तसेच अन्य मूलभूत सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे आणि नगरसेविका कुंदा संजय भिसे यांच्या वतीने संदीप विठ्ठल काटे यांनी दवाखान्याला भेट देत तेथील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

पाहणीदरम्यान औषधसाठ्याची उपलब्धता, आवश्यक औषधांची कमतरता, दवाखान्याच्या इमारतीतील दुरुस्तीची गरज तसेच नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे प्राधान्य असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांनीही दवाखान्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत त्या लवकरात लवकर सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version