Spread the love

डॉ.संजीवनी पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिवपदी डॉ. संजीवनी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. पांडे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीबद्दल विधान परिषद आमदार उमा खापरे यांनी डॉ. संजीवनी पांडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल आणि पक्षाची विचारधारा राज्यातील अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. संजीवनी पांडे यांच्या नियुक्तीमुळे भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version