Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक बांधिलकी जपत विश्वेश्वर सहकारी बँक, पुणे यांच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती अभियान दि.20.07.26 रोजी चिंचवड येथील रिव्हर साईड चौकात उत्साहात राबविण्यात आले.

या अभियानाद्वारे वाहनचालक व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करण्याचे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याचे तसेच सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी नागरिकांना जन जागृतीपर माहितीपत्रकांचे वाटप करून सुरक्षित वाहतुकीचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष श्री अनिल शेठ गाडवे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र मिरजे, संचालक श्री रविंद्र महाजन, श्री श्रेयस रुकारी, CEO- श्री हेमंत वऱ्हाडपांडे तसेच बँकेतील अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भविष्यातही समाजहिताच्या विविध जनजागृती उपक्रमांद्वारे विश्वेश्वर बँक सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प कायम ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version