Spread the love

विद्यार्थ्यांना अजितदादांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, निवेदनाद्वारे केली मागणी

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा फोटो लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची तत्पर कार्यपद्धती, प्रशासनावरील प्रभावी पकड, लोकसंग्रह तसेच शिक्षण व क्रीडा क्षेत्राबद्दलची आस्था ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा आदर्श घेता यावा आणि समाजहिताची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये स्व. अजितदादा पवार यांचा फोटो प्रमुख ठिकाणी लावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.

या मागणीवर महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या नेतृत्वाची ओळख करून द्यावी, अशी अपेक्षाही विशाल काळभोर यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version