
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व संगीत नाटक अकादमी, दिल्ली द्वारा आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सवात निवड झालेल्या थिएटर वर्कशॉप कंपनीच्या ‘कथा वंगभंगाची’ नाट्यप्रयोगाला बुधवारी (१५जुलै) निगडी येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
महाकवी कालिदास जयंती आणि वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व संगीत नाटक अकादमी, दिल्ली द्वारा आयोजित या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात पिंपरी चिंचवडच्या थिएटर वर्कशॉप कंपनी संस्थेची निवड करण्यात आली होती.
बुधवारी १५ जुलै रोजी ‘कथा वंगभंगाची’ हा नाट्यप्रयोग निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहामध्ये आयोजित केला होता.
नाट्यदिग्दर्शक, अभिनेता -निर्माते डॉ. संजीवकुमार पाटील,ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र आमले, ज्येष्ठ रंगभूषाकार बाळ जुवाटकर, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, रमेश वाकनीस, प्रतिभा महाविद्यालयाचे सीएओ डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रा. डॉ. रोहीत अकोलकर उपस्थित होते.
राष्ट्रीय महोत्सवात सादर झालेल्या कथा वंगभंगाची या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्रभाकर पवार यांनी केले. नाटकात अथर्व तलघट्टी, गणेश पाटील, अमृता ओंबळे, अमानत शेख,प्रसन्न कुलकर्णी, वेद काळे, शुभम गोळे, साक्षी पोखरकर, निहाल बागल, सानिका गाढवे, अभिषेक चाटे, शिवम नडगिरी यांनी रंगमंचावर पात्र साकारले. तर तांत्रिक बाजू बाळकृष्ण पवार आणि सचिन बहिरगोंडे यांनी नेपथ्य, अक्षय यादव यांनी प्रकाशयोजना, विवेक क्षीरसागर यांनी ध्वनिमुद्रण, रंगभूषा बाळ जुवाटकर, आदिती वाघ यांनी संगीत तसेच वैष्णवी देसाई, ऋतुजा भोर, अशोक शिवनगी यांनी सहाय्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी- कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रगीत आणि वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता करण्यात आली.
