
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे विचारप्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, सचिव प्रसाद केसरे, माजी अध्यक्ष हनुमंत नाना कसबे, अरुण जोगदंड, विशाल कसबे, स्वाती शिंदे, संतोष पाटील, विलास सकट, प्रियांका सकट, रियाज शेख, विल्यम साळवी, हिराचंद जाधव, हरीश डोळस, शंकर खवळे, सोमनाथ कांबळे, गणेश साठे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
