Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डोंबिवली येथील डॉक्टर आणि नर्सेसवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोशिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने (दि. २० रोजी) एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. अशी माहिती अध्यक्ष डॉ सुधीर भालेराव, सचिव डॉ विकास मंडलेचा,उपाध्यक्ष डॉ मिलिंद सोनावणे, डॉ अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. सुहास लुंकड, डॉ. मंदार डोईफोडे यांनी दिली आहे.

दि २० रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते दि.२१ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभरात बाह्य रुग्ण सेवा बंद राहिल. मात्र ज्या तातडीची वैद्यकीय सेवा, प्रसूती वैद्यकीय सेवा सुरू राहतील. असे ही नमूद केले आहे.डोंबिवली येथील एका नगरसेवकाने केलेल्या डॉक्टरांवरील हल्ला, डॉक्टर हा केवळ व्यवसाय करणारा मनुष्य नसतो; तो आशेचा दीपस्तंभ असतो. मृत्यूच्या दाराशी उभ्या असलेल्या रुग्णाला जीवनाची नवी संधी देण्याचा प्रयत्न करणारा तो एक कर्मयोगी असतो. परंतु आज दुर्दैवाने या कर्मयोग्याच्याच हातावर प्रहार होत आहेत. डॉक्टरांवरील हल्ले ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर ती समाजाच्या विवेकाला झालेली गंभीर जखम आहे.
रुग्णालय हे युद्धभूमी नसते; ते करुणेचे मंदिर असते. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे सैनिक नसले तरी ते जीवनरक्षक योद्धे असतात. दिवस-रात्र, सण-उत्सव, स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवून ते रुग्णसेवेत मग्न असतात. तरीही एखादा रुग्ण दगावला किंवा उपचार अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत की संतप्त नातेवाईक डॉक्टरांवर हात उगारतात. ही संतप्त भावना समजण्यासारखी असली, तरी हिंसा कधीच न्याय्य ठरू शकत नाही.
वैद्यकशास्त्र हे गणित नाही तर येथे व्यवसायापेक्षा माणुसकी जास्त महत्वाची असतें. डॉक्टर्स, सिस्टर यांच्यावर असे राजकीय गुंडाकडून होणारे भ्याड हल्ले थांबले नाहीत तर पुढच्या काळात डॉक्टर्स होण्यासाठी कोणी धजावणार नाही परिणामी वैद्यकीय खर्च अजुन महागडा होईल आणि यात सामान्य माणूस भरडला जाईल. तेंव्हा आताच या हल्लेखोरावर कडक कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे.

डोंबिवली येथे डॉक्टर्स, सिस्टर्स यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध…!

इंडियन मेडिकल असोसिएशन असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखा

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version