Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूल, कृष्णानगर येथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि संत परंपरेची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बाल दिंडी व शिवकालीन वेशभूषा’ हा सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, वारकरी तसेच विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेतून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मुलांच्या निरागस सादरीकरणाने आणि पारंपरिक पोशाखांनी वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले.
शाळेच्या कृष्णा नगर ब्रांच ओनर सौ. किर्ती मारुती जाधव व शिक्षकांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, इतिहास, सामाजिक मूल्ये आणि आत्मविश्वास यांची जपणूक होते. शिक्षणासोबतच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी केंब्रिज चॅम्प्स इंटरनॅशनल प्री-स्कूल सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.

यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version