
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज (१६ जुलै) रोजी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट यूजी परीक्षा २०२६ चा निकाल अधिकृतपणे घोषित केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश तसेच समुपदेशन प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी, यासाठी एनटीएने अत्यंत जलद गतीने काम करत नियोजित वेळेत हा निकाल जाहीर केला आहे.
या वर्षी २१ जून २०२६ रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १४ प्रमुख शहरांमधील एकूण ५,४४० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेसाठी जवळपास २० लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, यापैकी ११ लाख २१ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले असून ते देशातील विविध वैद्यकीय (MBBS), दंतवैद्यकीय (BDS), आयुष (AYUSH) आणि इतर संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सर्व उमेदवारांना त्यांचे स्कोअरकार्ड एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच neet.nta.nic.in वर पाहता येणार आहे.
निकालात मुलींचे वर्चस्व आणि राज्यांची कामगिरी
यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. एकूण पात्र उमेदवारांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक मुली आहेत. विशेष म्हणजे, मुलांच्या तुलनेत मुलींचा उत्तीर्ण होण्याचा सरासरी दर अधिक आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण मुलींपैकी ५६.८ टक्के मुली पात्र ठरल्या आहेत, तर मुलांचे हेच प्रमाण ५५.१ टक्के इतके आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे १७ ते १९ वर्षे वयोगटातील आहेत.
महाराष्ट्रातल्या या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
अतुल्या बाळासाहेब डोंगरे
श्रावणी कृष्णा कुदळे
मोहनीश मारुती भोसले
सार्थक महेश पाटील
सानिध्यां क्षितिज डोंगरे
अर्णव लाहोटी
प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे
रौशमीत गुप्ता
सोहम निशिकांत पाटील
सागर राजेश करीकर
सौम्या बदोले
अनुश्री अजय थोरात
आर्या अभिजित दिवेकर
सहिम सादिक पटवेगार
सुहाना सलीम शेख
अमीर वरावल्लाह
सार्थक पेठकर
श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे
नीट परीक्षा निकाल लिंक: Score Card for NEET UG 2026 link – https://examinationservices.nic.in/ResultoService26/Ntnt/Login
https://cnr.nic.in/ResultDir/Ntnt/Login
NEET UG Result 2026 PDF

