Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी निगडी येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आर. एस. कुमार यांच्या हस्ते होणार असून महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष मोहिनी पत्की बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
अशी माहिती पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिन कुलकर्णी व कार्याध्यक्ष महेश बारसावडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. निगडी, प्राधिकरण येथील विदर्भ सहयोग मंडळ येथे रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजता या बैठकीचे उद्घाटन होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक मधुसूदन मुळे, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, राष्ट्रीय सरचिटणीस विलास कौसडीकर, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन आदी निमंत्रक म्हणून सहभागी होणार आहेत. मोहिनीताई पत्की व डॉ. गोविंदराव कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शन करणार असून सत्यजित कुलकर्णी हे आगामी ब्रह्म उद्योगाबद्दल स्टार्टअप कॉनक्लेव्ह वृत्त माहिती सादर करणार आहेत.
दुपारच्या सत्रात प्रदेश पदाधिकारी मनोगत व्यक्त करणार असून जिल्हा निहाय अहवाल सादर करण्यात येणार आहेत.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version