Spread the love

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देहू गावामधून आलेल्या पालखीतील वारकरी बंधू भगिनींना बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी सुमारे तीन हजार पुडे बिस्कीटे वारकरी बंधु भगिनींना वाटण्यात आले .

श्री जवाहरलालजी,तुषारजी मुथा यांच्या दुकानाजवळ हे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी नवीन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया ,कार्याध्यक्ष विजय भिलवडे ,संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया ,माजी अध्यक्ष, विलासकुमार पगारिया , सूर्यकांत मुथियान, तसेच उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत,धीरज नहार आदी उपस्थित होते .यावेळी देहु संस्थानच्या विश्वस्तांचा तसेच सुरक्षा व्यवस्था पहाणार्या पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस स्टाफ यांचाही सत्कार महासंघाच्या वतीने करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version